logo-smallest-englishlogo-smallest-englishlogo-smallest-englishlogo-smallest-english
  • Home
  • Cinema
    • Bollywood
      • Movie Reviews
      • Articles
      • Trailers
      • Retro Bollywood
      • videos
      • Interview
    • Hollywood
      • Articles
      • Trailers
    • Regional Indian Cinema
      • Articles
  • News
    • Bollywood
    • Hollywood
    • Regional Indian Cinema
    • OTT
    • Television
  • Music
    • Hindi
    • Global
    • Indian Regional
  • OTT
    • Articles
    • Movie Reviews
    • Trailers
    • Web Series Reviews
  • Drama & Short Films
    • Drama
    • Short Films
  • Television
    • Articles
    • Interviews
  • About Us
    • Ruperi Retro
    • About Editor
    • Contact
  • Marathi
  • Home
  • Cinema
    • Bollywood
      • Movie Reviews
      • Articles
      • Trailers
      • Retro Bollywood
      • videos
      • Interview
    • Hollywood
      • Articles
      • Trailers
    • Regional Indian Cinema
      • Articles
  • News
    • Bollywood
    • Hollywood
    • Regional Indian Cinema
    • OTT
    • Television
  • Music
    • Hindi
    • Global
    • Indian Regional
  • OTT
    • Articles
    • Movie Reviews
    • Trailers
    • Web Series Reviews
  • Drama & Short Films
    • Drama
    • Short Films
  • Television
    • Articles
    • Interviews
  • About Us
    • Ruperi Retro
    • About Editor
    • Contact
  • Marathi
  • Home
  • News
  • सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !
आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
June 2, 2025

सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !

Published by admin at June 2, 2025
Categories
  • News
  • Regional Indian Cinema
Tags

‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’

प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात. माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे. या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे. माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्ग्ज व्यक्तींच्या कार्याचा गौरव माई मीडिया २४ प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५ ‘ देऊन केला जाणार आहे. येत्या ३ जूनला हा पुरस्कार सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क दादर येथे रंगणार आहे.

मा. ना. श्री.एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ, श्री. विजय पाटकर, अभिनेते (माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), प्रा. राम शिंदे, सभापती (विधान परिषद) नीलमताई शिर्के – सामंत (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद) आदि मान्यवरांचा विशेष गौरव या पुरस्कार सोहळ्यात केला जाणार आहे.

त्यासोबत सयाजी शिंदे(सामाजिक कार्य – निसर्ग संवर्धन), प्रसाद गावडे (रानमाणूस – उद्योग, पर्यटन क्षेत्र योगदान ), डॉ. नीलम गोऱ्हे (साहित्य क्षेत्र-ऐतिहासिक कार्य ), सुजाता रायकर ( आरोग्य क्षेत्र – थॅलेसेमिया मुक्ती दूत), डॉ. प्रदिप ढवळ (साहित्यक्षेत्र – सांस्कृतिक योगदान), ,अँड. संगिता चव्हाण (स्त्री सक्षमीकरण – सामाजिक कार्यकर्त्या), संतोष पवार ( सांस्कृतिक क्षेत्र- लोककला संवर्धन), वैदेही परशुरामी ( लक्षवेधी अभिनेत्री) नीतिन केळकर (पत्रकारिता जीवनगौरव), अनन्या गोयंका ( शिक्षण क्षेत्र – सामाजिक कार्य), किशोर आपटे (वरिष्ठ पत्रकार), मोहन बने ( ज्येष्ठ छायाचित्रकार), श्रीकांत बोजेवार ( ज्येष्ठ पत्रकार सल्लागार, महाराष्ट्र टाइम्स), संजीव भागवत (संशोधक पत्रकार दै. सकाळ), विशाल पाटील (संपादक,लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), प्रेरणा जंगम ( पत्रकार सकाळ प्रीमियर), श्वेता वडके (वृत्तनिवेदिका, न्यूज 18 लोकमत), रविराज इळवे (कामगार कल्याण कार्य महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त) या सोहळ्याला कला सामजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. हा केवळ पुरस्कार सोहळा नसून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र, मराठी भाषा, उद्योग, शेतकरी निसर्ग संवर्धन, पर्यावरण पर्यटन या विषयी जागर होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक – संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर, कार्याध्यक्ष – सचिन चिटणीस, कपिल देशपांडे, व्यवस्थापन/तांत्रिक – चेतन काशीकर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील, कलाविभाग – गणेश तळेकर, सुरज खरटमल आहेत. प्लॅनेट मराठीचे सहकार्य या पुरस्कार सोहळ्याला लाभले आहे.
समाजमाध्यम क्षेत्रातील स्वतंत्र पत्रकार व फोटो जर्नालिस्टस यांचे प्रसारमाध्यम असून; देशपातळीवर प्रसारमाध्यमांच्या सर्वसमावेशक विकास, सन्मान व सक्षमीकरणासाठी आधारस्तंभ असणारी ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ (माई) ही संस्था सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक आदि विषय केवळ बातमीतून न मांडता सक्रीय सहभाग घेण्याचे काम करतेय. लोकजागर चळवळ यातून ‘उभी होतेय अशी ही माई आहे. या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर आहेत.

admin
Website | + posts
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    मृण्मयी देशपांडे झळकणार सहा हिरोंसोबत एका फ्रेममध्ये?

admin
admin

Related posts

June 2, 2025

आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..


Read more
June 2, 2025

विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..


Read more
June 2, 2025

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले


Read more

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags

arun govil deepika

Categories

Articles Cinema Hollywood News Regional Indian Cinema Trailers Uncategorized
© 2021 Navrang Ruperi. All Rights Reserved.
Privacy Policy    |    Terms and Conditions   |    Disclaimer
Design and Developed by - Riyaans