logo-smallest-englishlogo-smallest-englishlogo-smallest-englishlogo-smallest-english
  • Home
  • Cinema
    • Bollywood
      • Movie Reviews
      • Articles
      • Trailers
      • Retro Bollywood
      • videos
      • Interview
    • Hollywood
      • Articles
      • Trailers
    • Regional Indian Cinema
      • Articles
  • News
    • Bollywood
    • Hollywood
    • Regional Indian Cinema
    • OTT
    • Television
  • Music
    • Hindi
    • Global
    • Indian Regional
  • OTT
    • Articles
    • Movie Reviews
    • Trailers
    • Web Series Reviews
  • Drama & Short Films
    • Drama
    • Short Films
  • Television
    • Articles
    • Interviews
  • About Us
    • Ruperi Retro
    • About Editor
    • Contact
  • Marathi
  • Home
  • Cinema
    • Bollywood
      • Movie Reviews
      • Articles
      • Trailers
      • Retro Bollywood
      • videos
      • Interview
    • Hollywood
      • Articles
      • Trailers
    • Regional Indian Cinema
      • Articles
  • News
    • Bollywood
    • Hollywood
    • Regional Indian Cinema
    • OTT
    • Television
  • Music
    • Hindi
    • Global
    • Indian Regional
  • OTT
    • Articles
    • Movie Reviews
    • Trailers
    • Web Series Reviews
  • Drama & Short Films
    • Drama
    • Short Films
  • Television
    • Articles
    • Interviews
  • About Us
    • Ruperi Retro
    • About Editor
    • Contact
  • Marathi
  • Home
  • News
  • ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र
Proin sed hendrerit nonummy
April 29, 2014
मृण्मयी देशपांडे झळकणार सहा हिरोंसोबत एका फ्रेममध्ये?
June 2, 2025

‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र

Published by admin at April 8, 2025
Categories
  • News
  • Regional Indian Cinema
Tags
  • arun govil
  • deepika
On the occasion of the film ‘Veer Murarbaji’… Arun Govil, Deepika Chikhaliya together

छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्रछत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत

प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवली आहे. या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या दोघांचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.

ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघे सांगतात. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत या दोघांनी व्यक्त केलं.

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होणार आहे.

admin
Website | + posts
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले

admin
admin

Related posts

June 2, 2025

सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !


Read more
June 2, 2025

आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..


Read more
June 2, 2025

विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..


Read more

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags

arun govil deepika

Categories

Articles Cinema Hollywood News Regional Indian Cinema Trailers Uncategorized
© 2021 Navrang Ruperi. All Rights Reserved.
Privacy Policy    |    Terms and Conditions   |    Disclaimer
Design and Developed by - Riyaans